Video चाळीसगाव : नारदाच्या गादीचा पोलीस निरिक्षाकडून अवमान

वारकारी संप्रदायात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया, माफी मागून प्रकरणावर पडदा, पण वारकर्‍यांना दमबाजी केल्याचं काय ?
Video चाळीसगाव : नारदाच्या गादीचा पोलीस निरिक्षाकडून अवमान

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी


चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर (Hanuman Singh Rajput Nagar) परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ (Kirtan) कीर्तन सप्ताह कार्यक्रम १० वाजेनंतर सुरु असल्याचे लक्षात येताच शहर पोलीस स्टेशनचे (Police Inspector KK Patil) पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला तसेच वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवले, यामुळे संपूर्ण वारंवारी संप्रदायाच अवमान केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.

या घटनेचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल झाले असता राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. घटनेचे गार्ंभीय कळाल्यानतंर (MLA Mangesh Chavan) आमदार मंगेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी सदर घटना अनवधानाने झाली असून मला पवित्र अश्या नारदाच्या गादीचे महत्व माहिती नव्हते असे सांगितले, कर्तव्य बजावत असताना हि चूक झाली असल्याने मी सर्व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागीतल्याचे आमदारांच्या कार्यालयातून सांगीतले.

घटनेचे गार्ंभीय लक्षात येवून माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू पो.नि.के.के.पाटील यांनी किर्तनाच्या ठिकाणी उपस्थित किर्तनकार महाराज व वारकरी यांना ज्या पद्धतीने दमबाजीची भाषा वापरली तीन निदंनीय आहे. एखाद्या पोलीस आधिकारी आशा पध्दतीने वारकर्‍याबद्दल भाषा किवा दमबाजी करत असेल यांची दखल वरिष्ठ पोलीस आधिक्षकांनी घेवून, के.के.पाटलावर कारवाई केली पाहिजे.

कायद्याच्या भाषेत एखाद्या गुन्हेगार चुक करुन माफी मागत असेल तर त्याला पोलीस माफ करतात, की त्यांच्यावर गुन्हां दाखल करतात, हा देखील प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन, दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.

नाहीतर उद्या पुन्हा एखादा आधिकारी अशी चुक करेल आणि माफी मागून मोकला होईल. या संबंधीत वरिष्ठ आधिकार्‍यांना विचाराना केली असता तक्रार आल्यानतंर काय ते पाहू असे सांगून ते मोकले झाले आहेत.

'' एकद्या वरिष्ठ आधिकार्‍याने वारकर्‍यांसोबत दमबाजीची भाषा वापरणे योग्य नाही. किर्तन वेळापेक्षा जास्त झाले म्हणून प्रेमाने सांगीतले असते. तर किर्तनकाराने किर्तन त्वरित संपवले असते. परंतू एखाद्या गुन्हेगारांसाठी वापरावी तशी भाषा के.के.पाटील यांनी वापरली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ आधिकार्‍यांनी दखल घेवून योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे '' .

ह.भ.प.ज्ञानेश्‍वर माऊली, सिद्धेवश्वर आश्रम, बेलदारवाडी

'' यासंबंधी प्रकरणाबद्दल अद्यापर्यंत कोणाचीही तक्रार नाही. तक्रार आल्यानतंर शहानिशा करुन, योग्य ती दखल घेतली जाईल '' .

रमेश चोपडे, अप्पर पोलिस अधिक्षक

Video चाळीसगाव : नारदाच्या गादीचा पोलीस निरिक्षाकडून अवमान
Breaking News अंगावरून ट्रक गेल्याने महिलेचा मृत्यू ; दुचाकीस्वार गंभीर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com