अपप्रचार वा अफवा पसरविल्यास होणार कारवाई

कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांची माहिती
अपप्रचार वा अफवा पसरविल्यास होणार कारवाई

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हयात कोविड लसीकरणासाठी 2450 लसीचे डोस प्राप्त झाले असून आतापर्यत फ्रं टलाईन आरोग्य सेवा देणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यासह दुसर्‍या टप्प्यात वरीष्ठ श्रेणीचे अधिकारी यांचे लसीकरण केले जात आहे.

कोरोना लस सुरक्षित व परीणाम कारक आहे. परंतु बर्‍याच ठिकाणी अर्धवट माहितीच्या आधारावर कोरोना लस घेउनही कोरोना बाधीत अपप्रचार वा अफवां. पसरविल्या जात आहेत. असा अपप्रचार करणार्‍या व्यक्तींविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 2450 व्हायल जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त झाले आहेत. एका लाभार्थ्यांस .5 मि.ली. प्रमाणे एका व्हायल मधे 10 लाभार्थी असे प्रमाण आहे. त्यानुसार 24हजार 500 लसीची मात्रा असून आतापर्यंत 19हजार 421 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तर 1610 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

प्रतिकारक्षमता निर्मितीस लागतात 42 दिवस

आयसीएमआर, केन्द्रीय आरोग्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालानुसार कोवीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन सुरक्षित आणि परीणाम कारक आहेत. लस घेतल्यानंतर कोवीड प्रतिकारक्षमता निर्माण होण्यास पहिला डोस घेतल्यानंतर किमान 42 दिवस तर दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनंतर निर्माण होते.त्यामुळे लस घेतलेली असली तरी या कालावधीत कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

तर होणार कायदेशीर कारवाई

परंतु बर्‍याच ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उपयुक्ततेबाबत आणि ती घेतल्यानंतर होणार्‍या साईड इफेक्ट बाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जात आहेत. या लसी संदर्भात गैरसमज आणि अफवा पसरविणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असा इशारा जिल्हा शल्य चिकीत्सक तथा नोडल अधिकारी डॉ.चव्हाण यांनी व्टिटरव्दारे आणि दिलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com