मीटर प्रमाणे प्रवासी वाहतूक न केल्यास ही कारवाई होणार

मीटर प्रमाणे प्रवासी वाहतूक न केल्यास ही कारवाई होणार

जळगाव - jalgaon

जळगाव शहरातील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे. त्या सर्व ऑटोरिक्षा (Autorickshaw) चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे.

मीटर प्रमाणे प्रवासी वाहतूक न केल्यास ही कारवाई होणार
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

प्रत्येक परवानाधारक ऑटोरिक्षाला (Motor vehicle rules) मोटार वाहन नियम 119 व 137 अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत परवाना अटींचे उल्लंघन करता येत नाही. अन्यथा ऑटोरिक्षा परवाना धारकावर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकरी (Shyam Lohi) श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असून ही बाब कायदेशीर आहे. 1 नोव्हेंबर, 2021 रोजी झालेल्या लोकशाही दिनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक हे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविता अवाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे.

जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन करण्यात येते की, सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी लवकरात लवकर आपल्या रिक्षांना फेअर मीटरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी. असे न झाल्यास संबंधित ऑटोरिक्षा परवाना धारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

विना फेअर मिटर तसेच ना-दुरुस्त फेअर मिटर असतांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांविरुध्द जिल्हाधिकारी, जळगाव व पोलिस अधिक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव व शहर वाहतूक शाखा, जळगाव यांचे संयुक्त पथकाव्दारे तपासणी मोहिम 9 नोव्हेबर पासून सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत एकूण 98 विना फेअर मिटर/ना- दुरुस्त फेअर मिटर असलेल्या ऑटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 67 हजार 400 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम अविरतपणे सुरु ठेवण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटोरिक्षा परवानाधारक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटोरिक्षा चालकाविरुध्द उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0257-2261819 किंवा mh19@mahatranscom.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. तक्रार प्राप्त ऑटोरिक्षा परवानाधारकावर कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही श्री. श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com