पारोळा तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

पारोळा तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई

पारोळा Parola (प्रतिनिधी)

येथील महसूल विभागाने (Revenue Department) व पोलीस खात्यातर्फे (Police Department) अवैध वाळू (sand) वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना पकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

याबाबत पारोळा तालुक्यातील बोरी नदीपात्रातून बहादरपूर, भिलाली, कोळपिंपरी, उंदीरखेडा, नागेश्वर या भागातून सर्रास अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असताना तहसीलदार अनिल गवांदे व पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या पथकांनी तीन प्याजो रिक्षा अवैध वाळू वाहतूक करताना पकडून पोलीस ठाण्यात जमा केल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com