संपकरी 22 बस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई

कामावर रुजू नसल्याने कारवाई ः जळगाव आगाराचे 8 तर 14 भुसावळ आगारातील कर्मचार्‍यांचा समावेश
संपकरी 22 बस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एस.टी. (S.T.)च्या सुरु असलेल्या बेमुदत आंदोलनात (indefinite movement) सहभागी जळगाव विभागाच्या (Jalgaon division) 22 बस कर्मचार्‍यांवर (employees) सोमवारी बडतर्फची कारवाई (Bad action) करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये 8 जळगाव आगारातील तर 14 कर्मचारी भुसावळ आगारातील आहेत.

एस.टी. विभागाला राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात एस.टी. कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. राज्य शासनाकडून कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही कर्मचारी मागण्यांवर ठाम आहे. बस कामगार कामावर रुजू होत नसल्याने एस.टी.ची सेवा ठप्प झाली आहे.

आतापर्यंत 350 कर्मचारी निलंबित

जळगाव आगारात कारवाईच्या इशार्‍यानंतर 35 चालक 35 वाहक रूजू झाले आहे. या कर्मचार्‍यांच्या आधारावर तीन ते चार मुख्य मार्गावर बसेसवा सुरु आहे. आतापर्यंत नोटीस देवूनही कामावर रुजू न झाल्याने जळगाव विभागात एकूण 350 कर्मचार्‍यांवर आतापर्यंत निलंबनांची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर बस कर्मचार्‍यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. मात्र कर्मचारी तारखा मागत आहेत. सदरच्या कर्मचार्‍यांवर कामावर रूजू होण्याबाबत जळगाव विभाग नियंत्रकांतर्फे अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कर्मचारी कामावर रूजू न झाल्याने जळगाव आगारातील 8 व भुसावळ आगारातील 14 अशा एकूण 22 कर्मचार्‍यांवर सोमवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com