नववर्षाच्या स्वागता सोबत 251 तळीरामांवर कारवाई

5 लाख 30 हजारांचा दंड वसूल; चौकाचौकात वाहनांची तपासणी; दहा हजाराच्या दंडाची धास्ती
नववर्षाच्या स्वागता सोबत 251 तळीरामांवर कारवाई

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year's Swagat)अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करुन जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाचे स्वागत करतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. म्हणून पोलीस दलाकडून खबरदारी घेण्यात आली. दोन दिवसात मद्य प्राशन (Talirams) करुन वाहन चालविणार्‍यांवर 251 जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची (Drunk and drive) कारवाई (Action) करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 30 हजार 650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे्‌

नवीन वर्षाचे स्वागत व मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरातील हॉटेल्स विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली काही हुल्लडबाजांकडून सार्वजनिक शांतता भंग करण्याचे प्रकार केले जात असतात. तसेच मद्यप्राशन करुन भरधाव वेगाने वाहन चालवून सर्वसामान्य नागरिकांना देखील त्रास देत असल्याचे प्रकार घडत असतात.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कंबर कसली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून शहरातील विविध भांगांसह चौकाचौकांमध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांची तपासणी केली जात होती. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात मद्य प्राशन करुन वाहने चालविणार्‍या 251 वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेकांच्या खिशाला भुर्दंड बसला असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख 30 हजारांचा दंड देखील वसुल करण्यात आला आहे.

संपुर्ण पोलीस दल रस्त्यावर

नवीन वर्षाचे स्वागत करतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी खबरदारी म्हणून पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षकांसह 2 अपर पोलीस अधीक्षक, 9 पोलीस उपअधीक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 138 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक, 866 पोलीस अंमलदार, 1 क्युआरटी पथक, 8 आरसीपी पथकाकडून रस्त्यावर उतरले होते.

ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई

शनिवारी सायंकाळपासून शहरातील विविध चौकांसह मुख्य रस्त्यांवर पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी रात्रीच्या सुमारास वाहनांचालकांची तपासणी केली जात होती. दरम्यान, मद्य प्राशन करणार्‍यांची ब्रेथ अ‍ॅनलायझरद्वारे तपासणी करुनच त्यांना सोडण्यात येत होते.

3 हजार 902 वाहनांची तपासणी

जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 134 ठिकाणी तपासणी केली जात होती. दोन दिवसात सुमारे 3 हजार 902 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1 हजार 128 वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com