मानेवर चाकू लावून अत्याचार करणारा जेरबंद

शनिपेठ पोलिसांची कारवाई ; कुसूंबा येथून घेतले ताब्यात
मानेवर चाकू लावून अत्याचार करणारा जेरबंद

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

तरुणीच्या मानेवर चाकू लावित तिच्यावर अत्याचार करणार्‍या विनोद सुकलाल भोळे याच्या कुसूंबा येथील मुर्ती बनविण्याच्या कारखान्यामागून शनिपेठ पोलिसांनी (police) मुसक्या आवळल्या.

मानेवर चाकू लावून अत्याचार करणारा जेरबंद
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!

शहरातील एका परिसरात राहणार्‍या तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधत तिच्या घरात शिरला. तसेच तरुणीच्या मानेवर चाकू लावून तिला स्वत:च्या घरात घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि.1 रोजी घडली होती.

याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयित विनोद सुकलाल भोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी विनोद भोळे हा फरार झाला होता.

दरम्यान, संशयित भोळे हा जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील मुर्ती बनविण्याच्या शेड मागे लपून बसला असल्याची माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहूल पाटील, परिस जाधव, अनिल कांबळे, मुकूंद गंगावणे, विजय निकम यांना मिळाली. त्यांनी तात्काळ तेथे जावून विनोद भोळेच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com