
मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव ग्रामीण पोलिसाच्या पथकाने कन्नड घाटात नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी निर्दयीपणे चारचाकी वाहनात एकावर एक कोंबून वाहतूक करणार्या सात गायीची सुटका केली आहे. यात खिलारी व गावराणचा गायीचा समावेश आहे. प्राप्त माहितीनूसार शहरातील एकभागातून या गायी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, चाळीसागाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.धमरसिंग सुंदरडे, पोना.संदिप ईश्वरलाल पाटील, पोहेका. विकास चव्हाण, पोकॉ.रोकश काळे, प्रकाश पाटील आदि हे दि, ८ रोजी चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गवरील कन्नड घाटातील रिपीटर हे नाकाबंदी करीत असताना. चाळीसगाव कडून- कन्नडकडे एक पीकअप गाडी(एमएच ०४, एफडी ९५६६) भरधाव वेगाने जात असताना, पोलिसांच्या पथकाने तिला थांबवली, चालकाचेे नाव विचारले असता त्यानी नाव जुबेरखान हमीद खान(२३) रा.सदानंद हॉटेल जवळ घाटररोड चाळीसगाव व अतिक खान खलील खान(२२) रा. छोटी गुजरी, चौधरीवाडा चाळीसगाव असे सांगीतले. वाहनाबाबत विचारणा केली असताना, त्यांनी उडावी-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात एकावर एक सात गायीची निर्दयपणे कोंबून भरलेल्या होत्या. त्यात चार गायी खिलारी व एक गाय गावराण जातीची आहेत, पोलिसांच्या पथकाने लालगीच गायीसह पिकअप वाहन ग्रामीण पोलीस स्टेशनला आनुन गायीची सुटका केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दरम्यान आरोपींच्या सुटकेसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चौधरीवाडा भागातील काही त्यांचे साथीदार जमा झाले होते. त्यापैकी काही जण १५ दिवसांपूर्वीच्या पावत्या आनल्यानतंर सर्वजण सुटतील अशी चर्चा करीत होत. तसेच खरेदी-विक्रीच्या १५ दिवसांपूर्वीच्या पावत्याची जुळवा-जुळव करण्यासाठी त्यांची फोना-फानी सुरु होती. विशेष म्हणजे या गायीच्यी किम्मत तब्बल दोन लाखांच्या पुढे असून त्यातील काही गायीच्या बॅक व सोसायटीमार्फत घेतलेल्या असल्यामुळे त्यांच्या कानात बिल्ले असून काही गायी दुधाच्या असल्याचे निदर्शनास आले. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव शहरातून कन्नडघाटातून कत्तलीसाठी गायीची वाहतूक केली जाते. परंतू महामार्ग पोलिसातील काही भ्रष्ट्र कर्मचारी व अधिकारी अशी वाहने चिरमिरी घेवून सोडून देत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महमार्ग पोलिसांतील भ्रष्ट्र प्रवृत्तीच्या आधिकारी व कर्मचार्यांची तात्काळ उंचलबागडी करावी अशी मागणी होत आहे. तसेच चाळीसगाव शहरात देखील मोठ्या प्रमणात गायीची अवैद्यपणे खरेदी-विक्री होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्याची गरज आहे.