
अमळनेर - amalner
वीट भट्टी चालवण्यासाठी नाहरकत दाखला देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील नीम येथील ग्रामसेवकाला (Gram sevak) जळगाव (jalgaon) येथील लाचलुचपत विभागाने (acb) रंगेहाथ पकडले आहे.
अमळनेर तालुक्यातील नीम येथे वीट भट्टी चालवण्यासाठी एकाने महसूल विभागाकडे ६ हजार रुपये रॉयल्टी भरली होती. तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला लागेल व त्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी मागितली तक्रारदाराने जळगाव येथे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानन्तर २३ रोजी दुपारी डीवायएसपी शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एन एन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांनी सापळा रचून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.