जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

कारवाईसाठी मनपाचे चार पथक
 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

जळगाव - JALGAON

कोरोनाचा (Corona outbreak) प्रादुर्भाव कमी झाला असलातरी नवीन ओमिक्रॉन विषाणूचे (Omicron virus) संकट (Crisis) ओढावले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा निर्बंध (Restrictions) लागू करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन (Violation of rules) केल्यास संबंधीतांवर कारवाई (Action) केली जाणार आहे. त्यासाठी मनपा प्रशसनाने (Municipal administration) स्वतंत्र चार पथक (Squad assigned) नियुक्त केले आहे.

राज्यासह देशभरात ओमिक्रॉन या नवीन विषाणुचा प्रसार वाढू लागला आहे. राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुन्हा निर्बंध लागू केले असून, ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. मॉल, आस्थापने, सिनेमागृह, लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. ओमिक्रॉनचा प्रसार टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

त्या पार्श्‍वभूमिवर शहरात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले जाते की नाही. यासाठी मनपा प्रशासनाने स्वतंत्र चार पथक नियुक्त केले आहे. हे पथक ३० कर्मचार्‍यांचे असून शहरात पाहणी करणार आहेत. शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयांमध्ये येणारे मॉल, दुकाने मंगल कार्यालये, सराङ्ग बाजार, व्यापारी व अन्य आस्थापनांना भेटी देवून पाहणी करण्याचा अधिकार पथकाला देण्यात आलेला आहे.


ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमिवर पुन्हा निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश देवू नये. अशा सूचना देखील मनपा प्रशासनाने दिल्या आहेत.


जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व ङ्गौजदारी संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com