मांडूळ सर्पाची तस्करी ; रोझोदा येथील एकास अटक

रावेर वनविभागाकडून झाली कारवाई
मांडूळ जातीचा सर्प घरी लपवून ठेवलेल्या आरोपीसह यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर, आनंदा पाटील, रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे व कर्मचारी.
मांडूळ जातीचा सर्प घरी लपवून ठेवलेल्या आरोपीसह यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर, आनंदा पाटील, रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे व कर्मचारी.

रावेर|प्रतिनिधी raver

रोझोदा (ता.रावेर) येथील एकाने मांडूळ जातीचा सर्प घरात लपवून ठेवल्याची माहिती वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी प्राप्त झाली होती, त्या अनुषंगाने टाकलेल्या धाडीत मांडूळ सर्प (Mandul snake) मिळून आल्याने,एका विरुद्ध रावेर वन विभागात गुन्हा नोंद करून ,आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मांडूळ जातीचा सर्प घरी लपवून ठेवलेल्या आरोपीसह यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर, आनंदा पाटील, रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे व कर्मचारी.
Visual Story पारंपारिक साडी लूकमध्ये अशी दिसते पूजा सावंत

रोझोदा येथील देवेंद्र गिरधर लिधुरे कडे गांडूळ सर्प लवपुन ठेवला असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती.त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून मांडूळ सर्प हस्तगत केला आहे.सदरील कारवाई यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे,यावल वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर,फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल आनंदा पाटील,रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम१९७२ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. कार्यवाहीसाठी पोलीस पाटील रोझोदा, वनपाल रावेर रवींद्र सोनवणे,वनपाल फैजपूर अतुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तडवी,वनरक्षक- संभाजी सूर्यवंशी,गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे,कृष्णा शेळके, युवराज मराठे, राजू बोंडल, अरुणा ढेपले,आयशा पिंजारी, सविता वाघ, वाहन चालक आनंद तेली, इमाम तडवी सचिन पाटील, विनोद पाटील यांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com