थकबाकी न भरणार्‍यांवर आजपासून कारवाई

आढावा बैठकीत आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिल्या सूचना
थकबाकी न भरणार्‍यांवर आजपासून कारवाई

* आतापर्यंतचा उच्चांक

* 100 कोटींचे उद्दिष्ट

*अन्यथा कारवाई

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शंभर टक्के शास्ती माफीची अभय योजना (Abhay scheme of amnesty) देवून सुध्दा जे मालमत्ता थकबाकीदार (Property outstanding) थकबाकी भरायला तयार नाहीत, अशांंवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये धडक कारवाई (strike action) शनिवार दि.19 पासून करण्याच्या सूचना सर्व पथकप्रमुखांना महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहे.

मनपा सभागृहात प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 अंतर्गत असलेले मालमत्ता कर थकबाकी वसुली संदर्भात दुपारी चार वाजता आढावा बैठक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आयोजित केली होती. बैठकीत वसुली नियंत्रण अधिकारी, प्रभाग अधिकारी, पथक प्रमुख, कर अधीक्षक, व सर्व प्रभाग समिती कार्यासन लिपिक उपस्थित होते. यावेळी बैठकीत अभय शस्ती योजनेस शहरातील मालमत्ताकर थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे, याबाबत समाधान आयुक्तांनी केले.

17 मार्चपर्यंत निव्वळ वसुली 85 कोटी 48 लाख झालेली आहेत. त्यावर 8 कोटी 28 लाख रुपये नागरिकांना शास्ती माफ झालेली आहे. एकूण वसुली 93 कोटीपर्यंत झालेली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक असला तरी 31 मार्च पर्यंत वसुली 100 कोटी रुपया पर्यंत करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिल्या.

शिस्तभंगाची होणार कारवाई

जे पथक उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहेत. जे चांगली कामगिरी करतील त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. अशा सूचना आयुक्तांनी अधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या. तसेच प्रत्येक पथकप्रमुख यांना रोज 5 मालमत्ता थकबाकीधारकांवर अधिनियमांतर्गत धडक कारवाई करण्याचे टार्गेट दिलेले आहे.

प्रभाग कार्यालये सुरु राहणार

शहरातील मालमत्ता थकबाकीदार धारकांना मालमत्ता कराचा भरणा भरणा करता यावा याकरिता शनिवार व रविवार दुपारी 2:00 वाजे पावतो प्रभाग समिती कार्यालये सुरू राहणार आहेत. तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करावा. असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. गायकवाड व महसुल विभागाचे उपायुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com