पोक्सोच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या ताब्यात

म्हसावद तेथून रात्री उशिरा केली अटक : आरोपीच्या घरी युवकांनी घातला गोंधळ
पोक्सोच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या ताब्यात

भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

येथील तालुका पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी ला एलसीबीच्या (LCB) पथकाने 15 रोजी रात्री उशिरा म्हसावद या. जळगाव येथूनअटक केल्याची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील साकेगाव येथील जुबेर युसुफ पटेल (वर २१) याच्याविरुद्ध 14 रोजी येथील तालुका पो.स्टे. मध्ये दाखल गु.र.न 170 /2021 भा.द.वी 354(ड), 341, 500, 506 पोकसो 8,12 प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी जुबेर युसुफ पटेल (वय 21, रा.साकेगाव ता.भुसावळ) हा गुन्हा घडल्या पासुन फरार होता.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी व एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अशोक महाजन, हे.कॉ लक्ष्मण पाटील, हे.का. अक्रम शेख, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणंजीत जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील, चालक.पो.कॉ.मुरलीधर बारी यांच्या पथकाने सापडा रचून त्याला म्हसावद ता. जळगाव येथून अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीताची वैदयकीय तपासनी करुन भुसावळ तालुका पो.स्टे च्या ताब्यात दिले.

दरम्यान 15 रोजी काही युवकांनी आरोपीच्या घरी गोंधळ घातल्याचे समजते यातील काही जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना समज देण्यात आली. पुढील तपास डी वाय एस पी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com