महिलेच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या आरोपीला ५० हजाराचा दंड

भुसावळ सत्र न्यायालयाचा निर्णय : अपिलाच्या खटल्यात झाला निकाल
महिलेच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या आरोपीला ५० हजाराचा दंड

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal -

तालुक्यातील खंडाळा (Khandsla) येथील पीठ गिरणीच्या पट्टयात (flour mill belt) अडकून दुखापत झाल्याने मूत्यू (Death) झालेल्या महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई (Compensation) म्हणून ५० हजारांच्या दंडाची शिक्षा (penalty) येथील सत्र न्यायमुर्ती (Sessions Judge) आर. एम. जाधव (R. M. Jadhav) यांच्या न्यायालयाने २२ रोजी सुनावली.


याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील खंडाळा येथील आरोपी सोपान पंडित घ्यार (Sopan Ghyar) यांची पीठाची गिरणी आहे. गिरणीला जाळी लावण्यात आलेली नसल्याने गिरणीत दळण घेऊन गेलेल्या सुभद्राबाई घ्यार (Subhadrabai Ghyar) यांच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यात अडकून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना ३ डिसेंबर २०१३ रोजी घडली होती.
याबाबत गावातील पोलीस पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती. दरम्यान उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने तपासात आरोपीचे दुर्लक्ष व निष्काळजी पणाने तीचा जिव गेल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारतर्फे ओएसआय शे. रशिद ह्यांनी तक्रार दिली होती. आरोपी विरुद्ध भा.दं.वि कलम ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्याची चौकशी भुसावळ न्यायालयात होऊन आरोपीस ३ महीने कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील तत्कालीन प्रथम वर्ग न्यायाधिश यांनी २४ ऑगस्ट २०१८ रोजी दिला होता. त्यात मयतच्या वारसांना १५०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश करण्यात आला होता.
न्यायालयाच्या या निकाला विरुद्ध आरोपी सोपान घ्यार यानी अपील दाखल केले. त्या अपिलाचा निकाल २२ नोव्हेंबर रोजी २ रे अती. सत्र न्या. आर. एम. जाधव यांच्या न्यायायाने दिला. त्याला पूर्वीचे ३ हजार व उर्वरित ४७ हजार असा एकुण ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा व ३ महीणे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता म्हणून ऍड विजय खडसे ( vijay Khadse) नी कामकाज पाहीले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com