
भुसावळ (प्रतिनिधी) - Bhusawal
येथील न्यु ईदगाह मुस्लीम कॉलनी जवळील कॉम्प्लेक्समध्ये फिरोज मोहम्मद नसिमखान (वय 38, द्वारका नगर) यांचे आयान इलेक्ट्रीकल दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना 4 रोजी सकाळी उघडकीस आली होती. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह अटक केल्याची कारवाई केली.
बाजरपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील न्यु ईदगाह मुस्लीम कॅालनी जवळील कॅामप्लेक्सधील अयान ईलेक्ट्रीक दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून आत प्रवेश करुन दुकानातून पाणी भरण्याच्या ईलेक्ट्रीक 13 लहान मोठ्या मोटार, कुलरच्या 5 मोटर, हॅड ग्रॅन्डर 3, सिलंग फॅन 10 व इलेक्टीक वायर तसेच 30 किलो कॅापरची जुनी वायर असा एकूण 67 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घटना 4 रोजी सकाळी उघडकीस आली होती.
याबाबत, बाजारपेठ पोलीसात गुरनं. 496/2022 भादंवि 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पो.नि. राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडेे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. विजय बळीराम नरेकर, पो. काँ. निलेश बाबुलाल चौधरी, पा. काँ. उमाकांत पाटील, पो.काँ. प्रशांत परदेशी, पो.काँ. योगेश माळी, पो.काँ. जावेद शहा हकीम शहा यांच्या पथकाने शहरातील शादाबखान शकीलखान (वय 24), साहील शेख सलीम शेख (वय 20), रेहानखान शकीलखान (वय 19), वसीम शहा फारुक शहा (वय 21) या आरोपींंना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.