महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात सुरुच

प्राधिकरणाचा निष्काळजीपणा : नवोदय अंडरपासजवळील प्रकार, निष्पापांचा जातोय जीव
महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात सुरुच

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

भुसावळ शहरा जवळील राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highways) चौपदरीकरणाचे (Four-laning) काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र महामार्ग प्राधिकारणाच्या (highway authority) निष्काळजीपणाने (Negligence) मध्यप्रदेशासह रावेर, यावल कडून येणार्‍या अनेक वाहन धारकांना नवोदय अंडरपास (Navodaya Underpass) जवळ दिशा दर्शक फलक (Directional sign) नसल्याने त्यांची दिशाभुल (Misleading) होत असल्यामुळे वाहन धारक अंडरपास ऐवजी सर्व्हीस रोडने (Service Road) जातात. मात्र पुढे गेल्यानंतर सदरचा रस्ता विरुद्ध दिशेचा असल्याचे समजताच त्यांची तारांबळ उडत आहे. यामुळे महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघातांची (accidents) मालिका सुरुच आहे. यात निष्पापांचा बळी जात आहे.

विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांमुळे होताहेत अपघात - शहराजवळ महामार्गाच्या चौपदरीकरण होत आहे. यात शहरातील जळगाव रोड वरुन महामार्गावर जळगावच्या दिशेने वाहणे जाण्यासाठी नवोदय विद्यालयासमोर अंडर पास करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी वाहनधारकांना अंडरपासमधून जाण्यासाठीचा सुचना फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नसल्यामुळे वाहन धारक चुकुन उड्डाण पुलाच्या बाजुच्या सर्व्हीस रोडला धरुन विरुद्ध दिशेने साकेगाव कडे मार्गस्त होतात.

मात्र चुक लक्षात आल्यानंतर योग्या दिशेने जाण्यासाठी मार्ग शोधत जीव मुठित घेऊन पुढे जावे लागते. याच दरम्यान समोरुन एकतर्फी मार्गाने येणारे भरधाव वाहनधारकांना समोरुन येणार्‍या विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनांचा अंदाज नसल्याने अपघता होत आहेत.यात निष्पापांचे बळी जात आहे. ही बाबा नित्याचिच झालेली आहे.

30 रोजी पहाटे एकाचा दुर्दैवी मृत्यू - दरम्यान, अशाच प्रकारे मार्ग चुकलेला ट्रॉला विरुद्ध दिशेने 30 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास जळगावकडे जात असतांना तालुक्यातील साकेगाव येथील तीव्र गोलाकार उड्डाण पुलाच्या वळणावर जळगाव कडून येणार्‍या मुकेश परदेशी या निष्पाप युवकाला ट्रॉला व पिकअप व्हॅनच्या झालेल्या समोरासमोर अपाघतात दुचाकीसह चुराडा झाला व जीव गमवावा लागले.

यापूर्वीही याच महामार्गावर सुविधांचा अभाव असल्यामुळे व सुचना फलक नसल्याने अनेक अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. तरी महामार्ग प्राधिकारणाने कुंभकर्णी झोपेतून जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्राधिकारणार्‍या निष्काळजी पणाच्या कळसामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.

नागपूर वळणही धोक्याचे - याच मार्गावरुन नागपूरकडे जाणासाठी वळण आहे. मात्र त्यासंबंधीही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना तेथील पेट्रोल पंपाजवळून मोजक्याच जागेवरुन वळण घ्यावे लागते. वळण घेत असतानना जागा कमी असल्यामुळे दोन- तीन प्रयत्नांनंतर वाहन सर्व्हिस रोडवरुन मागार्गावरील नवोदय उड्डाण पुलाकडे मार्गस्त होतो. मात्र वळण घेत असतानना त्याच वेळे सर्व्हिस रोडवरुन येणारे भरधाव वाहने आडव्या झालेल्या वाहनावर आदळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

या ठिकाणी सर्व्हिस रोड व महामार्गाच्या रस्त्यात जवळपास 6 -8 इंचाचा फरक असल्याने वाहनांना वळण घेतांना त्रास होत आहे. अशा अनेक तांत्रीक चुकांमुळे महामार्गावर वाहन चालकांना जीव मुठित घेऊन प्रवास करावा लागत आहे.

चिखली ते तरसोद दरम्यानच्या 62 किमी मार्गावर अनेक ठिकाणी अशा तांत्रीक चुकांचा शोध प्राधिकारणाने गांभिर्यपूर्वक घेवून त्वरीत ते दोष दुर करण्याची अपेक्षा वाहनधारकांमधृून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com