बंधार्‍यात बुडून एकाचा मृत्यू

बंधार्‍यात बुडून एकाचा मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील पतोंडा येथील घटना

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पातोंडा शिवारात तितूर नदीवर बांधण्यात आलेल्या के. टी. वेअर बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी (Chalisgaon City Police Station) चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पातोंडा येथील नंदू श्रावण गायकवाड (40) हा काल बंधार्‍यापलीकडील शेतावर जातांना बंधार्यावरुन जात असतांना, त्याचा तोल जावून तो पाण्याने प्रवाहीत असलेल्या बंधार्‍यात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तब्बल १२ तासांनतंर सापडला आहे. याबाबतची खबर सुनिल मालचे यांनी पोलीसांत दिलेवरुन शहर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.