बोदवड येथील पंजाबराव बोरसे यांचे अपघाती निधन

बोदवड येथील पंजाबराव बोरसे यांचे अपघाती निधन

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

बोदवड येथील साकला कॉलनीतील रहिवासी तथा कोल्हाडी विकास सोसायटीचे सेक्रेटरी,पंजाबराव बोरसे यांचे जळगाव अपघाती निधन झाले. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात सकाळी साडेदहा वाजे दरम्यान, मोटरसायकल वरून वळण घेत असताना, ट्रकच्या चाकाखाली बोरसे चिरडले गेले. आणि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बोदवड तालुक्यात या अपघाताची बातमी कळताच सर्वांनाच धक्का बसला. श्री बोरसे मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे होते.या अपघाताचे वृत्त कळताच, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतीचा खूप मोठा धीर दिला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com