निलगायच्या धडकेत मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू

कुटुंबाचा आधार हरपला ; गावावर शोकाकळा
निलगायच्या धडकेत मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू

वाकोद, ता. जामनेर - (Wakod)

जामनेर येथून शाळेत निघाले असता पिंपळगाव गोलाईत व सोनाळा फाटा दरम्यान हॉटेल शिशोदीया जवळ धावत्या दुचाकीसमोर अचानक निलगाय आडवी आल्याने झालेल्या जबर दुखापतीमध्ये वडगाव ता. जामनेर येथील व जिल्हा परिषद शाळा पळसखेडा मुख्याध्यापक भास्कर रामदास मोहिते यांचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी घडली.

मूळचे वडगाव बु. ता. जामनेर येथील रहिवाशी वाकोद येथील जावई असलेले नोकरीनिमित्त जामनेर येथे स्थायिक असलेले भास्कर मोहिते हे पळसखेड ता. सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सकाळी घरून शाळेसाठी जायला निघाले आणी निलगाय प्रण्याच्या धडकेने रस्त्यात झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून डोक्यात हेल्मेट असून डोक्याला जबर मार लागल्याने कानातून रक्त आले होते. जामनेर येथे दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्येवर शव विचेदन करण्यात आले. जामनेर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अपघात स्थळी तात्काल त्यांच्या मागे चालत असलेले पहूर पोलीस अनिल राठोड यांनी अपघात होताच धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या भास्कर सरांना उचलून उपचारासाठी जामनेर रवाना केले, परंतु त्याचाही उपयोग झाला नाही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्राण ज्योत मालवली. जंगली प्राणी यांचेकडून होणाऱ्या अशा घटनेकडे वनविभागाने देखील गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे अपघात होणार नाही. या संदर्भात ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. वन्य प्राणी वाहतूक असलेल्या रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रोही प्राण्याने एका मुख्याध्यापकाचा जीव घेतला अशी ग्रामस्थ म्हणत होते.

शिस्त प्रिय मुख्याध्यापक म्हणून परिचित असलेले मोहिते सर यांच्या अंत्यसंस्कार वाकोद वडगाव पळसखेड सह पंचक्रोशीतील मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता शोकाकुल वातावरणात वडगाव बु. येथील त्यांच्याच शेतात अंत्यविधी करण्यात त्यांच्या पश्यात पत्नी मुलगा मुलगी भाऊ पुतणे असा पूर्ण परिवार त्यांच्या जाण्याने पोरका झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com