वाघोदा येथील हॉटेल मॅनेजरचा अपघाती मृत्यू

गुरुवारी रात्री १ वाजता घडली घटना
वाघोदा येथील हॉटेल मॅनेजरचा अपघाती मृत्यू

रावेर|प्रतिनिधी raver

वाघोदे बुद्रुक (ता.रावेर) येथील रहिवासी तथा महेंद्र ढाब्यावर मॅनेजर असलेल्या ३५ वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनांच्या धडकेने गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास अपघाती (accident) मृत्यू झाला. अपघातात मयत झालेल्या इसमाचे नांव नारायण साहेबराव धामोळे आहे.

महेंद्र ढाब्या वरील काम आटोपून रात्री १ वा घरी परतत असतांना हा अपघात घडला.त्या नंतर आलेल्या वाघोदा येथील ट्रक चालकास रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसून आल्याने घटना उघडकीस आली.या प्रकरणी सावदा पोलीसात सुनील इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ राणे यांनी शवविच्छेदन केले.या घटनेने मोठे वाघोदा गावात शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com