दीपनगर येथे कंत्राटी कामगाराचा अपघाती मृत्यू

दीपनगर येथे कंत्राटी कामगाराचा अपघाती मृत्यू

फेकरी, Fekri ता.भुसावळ । वार्ताहर

तालुक्यातील दीपनगर (Deepnagar) येथील औष्णिक विद्युत केंद्रामधील (Thermal power station) 210 मेगावॅट प्रकल्पात कंत्राटी कामगाराचा (contract workers) कोळसा पट्ट्यावर (कन्व्हेअर बेल्ट) कोळसा टाकण्याच्या वेळेस अपघाती मृत्यू (Accidental death) झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठेकेदार प्रभाकर सोनवणे यांच्या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून फेकरी येथील रहिवासी (मुळगाव हंबर्डी ता.यावल) चे अशोक बाबुराव हातकर (वय 60) हे 24 रोजी चार- बारा ड्युटी करीत असताना 10.30 वाजेच्या दरम्यान महानिर्मितीच्या 210 प्रकल्पातील कोळसा हाताळणी या पट्ट्यावर (कन्व्हेअर बेल्ट) कोळसा टाकत असताना अपघात झाला व त्यात अडकुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोळसा हाताळण्याच्या वेळेस तेथे कोळशाची धूळ उडते व त्यामुळे कोळशाचा पट्टा दिसत नाही. त्या ठीकाणी ठेकेदाराने कोळश्याच्या धूळीवर पाणी मारण्याची व्यवस्था अजून एका-दोन मुजराकडून करुन घ्यावी परंतु ठेकेदार मजुरी वाचवण्यासाठी एकाच मजुराला त्या कोळशाच्या पट्ट्या जवळ ठेवतो त्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. कंत्राटी कामगारांमधून बोलले जात आहे.

या घटनेची माहिती प्रकल्पात व परिसरात कळताच घटनास्थळी सेफ्टी अधिकारी मिलीन खंडारेसह अभियतांनी भेट दिली. परिसरातील लोकप्रतीनिधी व पत्रकार घटनेची माहिती घेण्यासाठी गेले असता तेथील वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना परवानगी दिली पण तेथील सुरक्षारक्षक कुणाल वाघोदे यांनी पत्रकारांना घटनास्थळी जाण्यास अडवले व त्यांच्याशी वाद घालून घटनेचे सत्य बाजू लपवण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ ठेकेदार आणि सुरक्षारक्षक यांच्या चिरीमिरी झाल्याचे समजते. सुरक्षारक्षकाच्या वागणुकीमुळे तेथील वातावरण तणावाचे झाले होते. या घटनेच्या विरोधात काही संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे असे रमाकांत तायडे यांनी सांगितले.

हातकर यांच्या मृतदेहाचे 25 रोजी भुसावळ नगरपालिका दवाखान्यात ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. घटनास्थळी एपीआय नारखेडे व पो.कॉ. प्रेम सपकाळे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मयत अशोक हातकर हे कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी मिळावी असे अखिल भारतीय जीवा सेनाची मागणी असून त्यांनी रुग्णालयाबाहेर ठेकेदार विरोधात आंदोलन केले. मात्र ठेकेदाराने अद्यापपर्यंत कोणते ही आश्वासन दिले नसून नियमानुसार मयताच्या कुटुंबास मदत मिळेल असे सांगितले.या घटनेमुळे दिपनगर प्रकल्पात व फेकरी परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

हातकर यांचे 31 डिसेंबरला 60 वर्षे पूर्ण होत होते व त्यांच्या सेवानिवृत्तीला फक्त सहा दिवस बाकी होते तरीसुद्धा त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेपेक्षा जड काम का दिले गेले? असा प्रश्न कामगारांमधून प्रश्न विचारला जात आहे. तरी प्रशासनाने साठ वर्ष वय झालेल्या कामगारांना कामगार अ‍ॅक्ट जी. आर. नुसार सेवानिवृत्त करावे व त्यांच्या कार्यक्षमतेनेनुसार कामगारांना काम द्यावे. प्रकल्पातील अनेक कंपन्यांमध्ये 60 वर्षावरील कर्मचारी काम करत आहे पण जीआर नुसार साठ वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना सेवानिवृत्ती करणे बंधनकारक आहे तरी मुख्य अभियंता यांनी याविषयी सखोल चौकशी करून 60 वर्षावरील कंत्राटी कामगारांना लवकरात लवकर कमी करावे व परिसरातील तरुण कामगारांना त्या ठिकाणी घेण्यात यावे अशी कामगार कर्मचार्‍यांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com