सिहोरहून परतताना अपघात; दोन महिलांचा मृत्यू

सिहोरहून परतताना अपघात; दोन महिलांचा मृत्यू

अमळनेर - प्रतिनिधी amalner

मध्य प्रदेशातील सीहोर येथे शिवमहाकथापुराण महोत्सव व रूद्राक्ष महोत्सवासाठी केलेल्या खान्देशातील भाविकांच्या वाहनाचा अपघात झाल्याने यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर अन्य जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

सीहोरला रूद्राक्ष महोत्सवात तुफान गर्दी, शिस्तीचा अभाव यामुळे कालच चेंगराचेंगरी सारखी घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना व अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त ताजे असतानाच आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या अपघातात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला शोभाबाई लुकडू पाटील (वय ५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय ५५) यांचा सिहोर हुन घरी परत येत असताना मध्यप्रदेशात जुलवानिया गावाजवळ MH १९ DV ६७८३ इको गाडीचा अपघातात दोघ महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१७ रोजी सकाळी घडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com