रेसच्या नादात दुचाकीस्वारने सायकलस्वाराला उडवल्याने जागीच मृत्यू

गलवाडे रस्त्यावरील घटना, मोटारसायकलस्वार ही झाला जखमी
अपघात | Accident
अपघात | Accident

अमळनेर - प्रतिनिधी amalner

दोन दुचाकीस्वारांनी रेस लावत बेदरकारपणे दुचाकी भरधाव वेगाने नेतांना एकाने निष्पाप सायकलस्वाराला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गलवाडे रस्त्यावर रात्री पावणेआठ वाजता घडली. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून त्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अपघात | Accident
करकी चेक पोस्टवर 21 लाखांचा गुटखा पकडला

अब्दुल गुलाब पिंजारी (वय ५६ रा. गलवाडे रोड) हे सायकलवर गलवाडे रस्त्यावर जात असताना एकमेकांत स्पर्धा लावणाऱ्या दोन मोटरसायकलस्वारा पैकी एकाने अब्दुल पिंजारी यांना उडवले. त्यांना मोटारसायकलचा जोराचा फटका बसल्याने खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते जागीच ठार झाले तर मोटरसायकलस्वार जखमी झाला. मयताचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तर जखमीला खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com