Accident दुचाकीला डंपरची धडक ; एक ठार, एक गंभीर

धरणगाव-अमळनेर रस्त्यावरील घटना, डी-मार्टचे कर्मचारी असल्याची माहिती
Accident दुचाकीला डंपरची धडक ; एक ठार, एक गंभीर

जळगाव - jalgaon

धरणगाव-अमळनेर रस्त्यावर भोणे फाट्याजवळ दुचाकीला डंपरने जबर धडक दिली. यात दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी खा. उन्मेश पाटील हे याच रस्त्याने जात असताना अपघात घडला असता त्यांनी जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केले आहे.

ही घटना आज दुपारीची असून दोनही दुचाकी स्वार हे डी-मार्टचे कर्मचचारी असल्याची माहिती समोर येत आहे. खा.उन्मेश पाटील यांनी डी-मार्टच्या प्रशासनाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असून अपघातग्रस्तांची नावे अद्याप समजली नाहीत. तपास पोलीस विभाग करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com