भरमसाठ शुल्क वाढीविरोधात अभाविपचा आक्रोश मोर्चा

विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ मांडला ठिय्या; शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी
भरमसाठ शुल्क वाढीविरोधात अभाविपचा आक्रोश मोर्चा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) विद्यापीठाने वाढविलेल्या भरमसाठ शुल्कावाडीच्या (large number of Shilkavadi) विरोधात आक्रोश मोर्चा (Outcry march against) काढण्यात आला. संपूर्ण विद्यापीठ भारत माता की जय, वंदे मातरम , कुलगुरू हमे पडणे,दो देश को आगे बडणे दो अश्या घोषणानी दणाणले होते.

उत्तर महाराष्ट्रात शिक्षण घेणार्‍या लाखो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्रोत म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची ओळख आहे.तरी अशी अचानक इतक्या प्रमाणात शुल्क वाढ करणे चुकीचे असून हा निर्णय विद्यापीठाने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी प्रांत मंत्री अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना केली. विद्यापीठामार्फत सुमारे 40 ते 73 टक्के पर्यंत शुल्क वाढ करण्यात आलेली आहे. या शुल्क वाढीचा फटका विभागातील गरीब विद्यार्थी, शेतकर्‍यांच्या मुलांना बसणार आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अभाविपने कुलगुरूंकडे केली आहे.

यांचा होता सहभाग

आंदोलनात विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, प्रांत शोधकार्य संयोजक अश्विन सुरवाडे, जिल्हा संयोजक मयूर माळी, महानगर मंत्री रितेश महाजन, चैतन्य बोरसे, नितेश चौधरी, भूमिका कानडे, पवन बावस्कर, हांसराज चौधरी, चेतन नेमाडे, प्रीतम निकम, वैभवि ढिवरे, मोनाली जैन, मनीष चव्हाण, योगेश अहिरे, आदित्य चौधरी यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com