
चाळीसगांव chalisgaon
शहरातील एका महिलेला (woman) लग्नाचे आमीष (lure of marriage) दाखवुन, एकाने, तिच्यावर ब्युटीपार्लर व इतर ठिकाणी अत्याचार (torture) केले. तसेच वेळोवेळी 4 लाख रुपये घेवु परत केले नाहीत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिलेला फिर्यादीवरून निरंजन अशोक लद्दे रा. मिलगेटच्या पाठीमागे, चाळीसगांव याने शहरातील एका महिलेचा विश्वास संपादन करुन, मला बायको पासुन समाधान मिळत नाही, मला तुझी आठवण येते, मला तुझी सवय झालेली आहे, मला माझी बायको आवडत नाही, तुच माझे एकमेव प्रेम आहे असे सांगुन तिच्या संमती शिवाय अँनीज ब्युटी पार्लर, चाळीसगांव येथे, आरोपीच्या घरी व शेतात तसेच महिलेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी अत्याचार केले.
त्यात महिला गरोदर राहिल्याने श्री समर्थ क्लिनीक येथे डॉ. यशवंत पवार यांच्याकडे गर्भपात करुन घेतला, तसेच महिलेकडून वेळोवेळी एकुण चार लाख रुपये घेवुन, तसेच सन 2000 पुर्वी मला अडचन आहे असे सांगुन सोन्याची चैन व सोन्याची अंगठी घेवुन, तसेच दिनांक 04/03/2023 रोजी तु जर आता मला पुन्हा लग्न, पैसा या गोष्टीसाठी विचारले तर मी तुझ्या नावाचे पत्र लिहुन आत्महत्या करुन घेईल अशी धमकी दिली. , त्रास असह्य झाल्याने महिलेने चाळीसगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून गुरनं.136/2023 भादवी कलम 376 (2) (n), 420, 506 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये सपोनि. सचिन कापडणीस हे करीत आहे.