तिघ्रे गावातून सुमारे 1 कोटींच्यावर गांजा जप्त

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकास अटक, चौघे फरार; ट्रॅक्टरभर गांजा; सर्वांत मोठी कारवाई
तिघ्रे गावातून सुमारे 1 कोटींच्यावर गांजा जप्त

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलिस ठाण्याच्या (Nasirabad police station) हद्दीत व राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोन किलो मीटर अंतरावर तीघ्रे (Tighre village) या लहानशा गावात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (Jalgaon Local Crime Branch) अधिकार्‍यांनी छापा घालून अंदाजे 885 किलो बाजारभावानुसार सुमारे एक कोटी 6 लाख 20 हजार रूपयांचा गांजा जप्त केला (Cannabis seized) आहे. जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतः सहकार्‍यांच्या मदतीने केली आहे.

या संदर्भात श्री.बकाले यांच्याशी ‘देशदूत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, इर्न्फामरने दिलेल्या माहितीवरून आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे तिघ्रे ता.नशिराबाद जि.जळगाव येथे सकाळी गेलो व आयुष प्रोकॉल प्रा.लि. या कंपनीच्या पाठीमागे मनोज रोहिदास जाधव हा राहत्या घरावर रेड केली असा तेथे मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.

या ठिकाणी मनोज रोहिदास जाधव यांच्या घरातून राहुल काशिनाथ सुर्यवंशी यास ताब्यात घेतले असून इतर चौघे फरार झाले आहे. त्यांचा शोध सुरू आहे. नशिराबाद पोलिस ठाण्यात सदर बाबत गुन्ह्याची उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे श्री.बकाले यांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नेमके किती किलो गांजा आहे व किती रक्कमेचा आहे याची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 885 किलोच्या वर गांजा असून त्याचा बाजार भाव हा 1 कोटी 6 लाख 20 हजार रूपये असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात ही सर्वांत मोठी कारवाई असून भुसावळ पोलिस उपविभागाअंतर्गत येत असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक जालिंदर फळे, अमोल देवढे, अनिल मोरे, दिपक पाटील, युनूस शेख, वसंत लिंगायत, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अनिल देशमुख, रमेश जाधव, विजय चौधरी, रवि नरवाडे, सुनिल दामोदर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, दर्शन ढाकणे, पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र साळूंखे, कमलाकर बागुल, विजय अहिरे, गजानन देशमुख, रवि इंधाटे, सुधिर विसपुते, समाधान पाटील, किरण बाविस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला आहे. अगदी लहानशा तिघे्र या गावात इतकी मोठी कारवाई झाल्याने जिल्हा हादरला असून पोलिस दलाचे कौतुक केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत नशिरबाद नगरपरिषद मुख्याधिकारी व पंच अंमली पदार्थ (नार्कोटिक्स) प्रतिबंधक विभागाचे व पोलिस दलाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com