बस चालकांना दंड करू नये ; होणारी लुट थांबवा

रावेर आगारातील २५ चालकांवर झालेली कारवाई रद्द करा
बस सेवा (File Photo)
बस सेवा (File Photo)

रावेर|प्रतिनिधी raver

महामार्ग वाहतूक शाखेने वेग मर्यादेचा नियम मोडल्याच्या कारणाने २५ एसटी चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.मात्र बस चालकांना हा दंड मान्य नसून,याबाबत बस चालकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे दंड रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे कि,एसटी बसचा स्पीड ६०/७० यावर जात नाही.महामार्गावर कुठेही वेग मर्यादेचे कलम  लावत महामार्ग पोलिसांकडून मनमानी कारभार चालू आहे.या रस्त्यावरून ८० वेग मर्यादेच्या पुढे वाहन चालवण्यावर निर्बंध आहे.एसटी ६०/७० च्या स्पीडने चालते तरीही दंड का ? रावेर आगारातील २५ चालकांना हा दंड झाला आहे.दंडाची रक्कम एक हजारांपासून ४ हजारांपर्यंत आहे.महामार्ग वाहतूक शाखेने कोणतीही पूर्व सूचना न देता,वाहन चालकांची लुट होत आहे.

याबाबत सखोल चौकशी व्हावी.बस चालकांवर झालेली दंडाची कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याकडे केली आहे.यावर प्रवीणसिंग परदेशी,राजेंद्र कोळी,के आर बाविस्कर, बी.एस. शिरसाळे,डी.एन.पवार,व्ही.वाय थेकळे, आर.पी.वाघोदे,जे.जि.लवंगे,डी.एस.तायडे,असलंम खान,सतीश ठाकूर,के.पी.तेली यांच्या सह्या आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com