संगीत, नृत्य अन् गीतांच्या जुगलबंदीत ‘अभ्यंगस्नान’

महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात सेवाधर्म परिवार संस्थेचा सामाजिक उपक्रम
संगीत, नृत्य अन् गीतांच्या जुगलबंदीत ‘अभ्यंगस्नान’

जळगाव jalaon। प्रतिनिधी

शहरातील सेवा धर्म परिवार(Seva Dharma Parivar) आणि फॅ ड स्पा (Fade Spa) या संस्थेचे वतीने गुरुवारी जळगाव शहरातील भजे गल्लीतील बेघर निवारा केंद्रातील (Homeless Shelter) आजी आजोबांसोबत (Grand parents) अनोखी दिवाळी साजरी (Celebrate Diwali) करण्यात आली. यावेळी चक्क आजी आजोबांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. तसेच त्यांची केसरचना करुन संगीतांसोबत, नृत्य अशा मैफिलसोबत आनंदोत्सवही साजरा करण्यात आला.

जळगाव शहरातील सेवा धर्म परिवार हा विविध सामजिक उपक्रम राबवित असतो याच उपक्रमा अंतर्गत फॅड स्पा आणि सेवा धर्म परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भजे गल्ली येथील बेघर निवारा केंद्रातील आजी आजोबांना दिवाळीच्या निमित्ताने त्यांचं केस संवर्धन करून देण्या बरोबरच दिवाळी पहाट महणून नयन मोरे याचे गिटार वादन आणि तेजस मोरे यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित सामाजिक बांधिलकी जोपासत येथील निराधार वृद्धांना आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी मिठाई वाटपही करण्यात आली. दिवाळीच्या मुहूर्तावर सेवा धर्म परिवार आणि फॅ ड स्पा तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे बेघर निवारा केंद्रातील आजी आजोबांनी मनापासून कौतुक आभार मानले.

यावेळी सेवा धर्म परिवाराचे चंद्रशेखर नेवे, बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, शीतल धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. बेघर निवारा केंद्राच्या वतीने फॅ ड स्पाच्या अमृता गुजर आणि गणेश सोनवणे यांचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनपाच्या गायत्री पाटील,वैभव चौधरी,राहुल पवार ,गणेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com