अबब... आज जळगावकर पचवणार एक लाख लिटर अतिरिक्त दूध

आज कोजागिरी पौर्णिमा
अबब... आज जळगावकर  पचवणार एक लाख लिटर अतिरिक्त दूध

भूषण श्रीखंडे

जळगाव jalgaon ।

शहरासह जिल्हाभरात कोजागरी पौर्णिमेला (Kojagari Purnima) मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी (demand for milk) असते. त्यामुळे दुधाचा तुटवडा होवू नये यासाठी जिल्हा दुध संघातर्फे (District Milk Unions) अतिरिक्त एक लाख लिटर (additional one lakh liters of milk) खरेदी (Purchase) केले आहे. त्यामुळे तिन लाख लिटर दुधाचे वितरण दुध संघातर्फे कोजागरीला केले जाणार आहे अशी माहिती संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये ( Executive Director Manoj Limaye) यांनी दिली.

कोजागरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात जळगाव शहरासह जिल्हाभरात साजरा केली जातो. या पार्श्वभूमीवर दुधाची प्रचंड मागणी असते त्यासाठी जिल्हा दुध संघातर्फे नियोजन केले जात असते. दररोज दुध संघातर्फे 2.25 लाख लिटर दुधाचे संकलन तर 2 लाख लिटर दुधाची विक्री होत असते. दसर्‍याला जळगाव शहरात दुधाचा तुटवडा जाणावल्यामुळे दुध संघातर्फे कोजागरी पौर्णिमेला दुध संघातर्फे नियोजन केले असून अतिरिक्त 1 लाख लिटर खरेदी केले आहे.

कोजागरी पौर्णिमा निमित्त बाजारपेठेत तिन लाख लिटर दुधाची मागणी बाजारपेठेतून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा दुध संघार्तफे एक लाख लिटर दुधाची खरेदी करून त्याचे वितरण केले जाणार आहे.

75 हजार लिटर दुधाचे वितरण

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोजागरी पौर्णिमा निमित्त कार्यक्रम होत असतात तसेच ग्राहकांडून दुधाची मागणी कोजागरीला मागणी वाढलेली असतात. त्यामुळे जळगाव शहरात 75 हजार लिटर दुधाचे वितरण दुध संघातर्फे केले जाणार आहे.

संकलन वाढविले जाणार

पावसाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने जिल्हा दुध संघात दुध संकलन होत असते. ऑक्टोंबर महिन्यापासून दुध संकलनात वाढ होत असून जानेवारी महिन्यार्पयंत तीन लाख लिटर दुधाचे संकलन केले जाण्याची शक्यता आहे.

वितरणातील गोंधळामूळे तुटवडा

दसर्‍याला जळगाव शहरात दुधाचा तुटवडा झाला होता. हा तुवटडा वितरणातील गोंधळामूळे झाला होता. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या वितरण व्यवस्थापनाकडून विशेष काळजी घेवून वितरण व्यववस्थित करण्याचे नियोजन केले आहे. कोजागिरी साजरी करण्यासाठी तरुणाईही सज्ज झाली आहे. एक दिवस आधीच खरेदीची सर्वत्र लगबग शहरात दिसून आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com