अबब...मालमत्ता कर भरण्यासाठी चक्क 10 हजाराची चिल्लर

मोजदाद करतांना मनपा कर्मचार्‍यांची दमछाक ; मोजणीसाठी लागले सहा जण
अबब...मालमत्ता कर भरण्यासाठी चक्क 10 हजाराची चिल्लर

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

शहरातील एका मालमत्ता धारकाने (property holder) मालमत्ता कराच्या भरणासाठी (Tax payment) तब्बल दहा हजाराची चिल्लर (chiller) घरपट्टी विभागात दिली. ही चिल्लर बघुन अनेकांनी डोक्यालाच हात मारला. मात्र कराचा भरणा नाकारता येणार नसल्याने चिल्लरची मोजदाद (Counting) करतांना मनपा कर्मचार्‍यांची (Employees) चांगलीच दमछाक झाली.

शहरातील मालमत्ता धारकांकडुन 31 मार्चपुर्वी कराचा भरणा (Tax payment)करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडुन (Municipal administration) आग्रह केला जात आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाकडुन आवश्यक ती नोटीसही बजावली जात आहे. शहरातील मालमत्ता धारक असलेले रतन अंबिकाप्रसाद तिवारी यांनाही 12 हजार 278 रूपयांच्या मालमत्ता कराची नोटीस बजावण्यात आली होती. या भरणापोटी मोहन तिवारी यांनी महापालिकेत एक रूपया, दोन रूपये अशी तब्बल दहा हजार रूपयांच्या चिल्लरची (chiller) गाठोडीच सहाव्या मजल्यावरील प्रभाग समिती (Ward Committee) कार्यालय क्रमांक एकमध्ये आणली. एवढी चिल्लर पाहुन मनपा कर्मचार्‍यांनी डोक्यालाच हात मारला.

चिल्लरच्या मोजदादसाठी लागले दोन तास

मालमत्ता कराचा भरणा करणे आवश्यक असल्याने मोहन तिवारी यांनी आणलेल्या चिल्लरची मोजदाद मनपाचे सहा कर्मचारी, हॉकर्स युनियनचे दोन पदाधिकारी आणि स्वत: मोहन तिवारी यांनी केली. एक आणि दोन रूपयांचे नाणे असलेल्या दहा हजार रूपयांची चिल्लर (chiller) मोजण्यासाठी तब्बल दोन तास लागले. ही चिल्लर मोजतांना कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक झाली. तसेच उर्वरीत रक्कमेचाही भरणा मोहन तिवारी (Mohan Tiwari) यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com