अबब! महिलेच्या पोटातून काढला ७ किलो वजनाचा मासाचा गोळा

४ तासाच्या अवघड शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
अबब! महिलेच्या पोटातून काढला ७ किलो वजनाचा मासाचा गोळा

रावेर Raver|प्रतिनिधी

येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये Sanjeevan Hospital एका २५ वर्षीय महिलेच्या पोटात गर्भासारखा वाढत असलेल्या ७ किलो मासाचा गोळा यशस्वी शस्त्रक्रिया Surgery करुन काढल्याने,महिलेची मरणासन्न यातनेतून सुटका करण्याचे यश डॉ.चंद्रदीप पाटील Dr. Chandradeep Patil यांना लाभले आहे.४ तासाच्या अवघड शस्त्रक्रियेने महिलेचा जीवनदान मिळाले आहे.

गुरुवारी दुपारी ११ वा.पाडळा येथील रुकसाना शरीफ तडवी वय-२५ हि महिला पोटातील गोळाच्या असह्य वेदना घेवून डॉ.चंद्रदीप पाटील यांच्याकडे दाखल झाली.रक्तचाचण्या आणि सोनोग्राफी करून सदरील महिलेवर तब्बल ४ तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ७ किलो वजनाचा गोळा बीजाशयासहित काढण्यात डॉ.पाटील यांना यश आले आहे.

तत्पूर्वी दीड महिन्याआधी सदरील महिलेने अधूमधून पोट दुखत असल्याने,खानापूर येथील डॉ.सुरेश पाटील यांच्याकडे उपचार घेतले.औषधोपचार करून थोडे दिवस बरे वाटल्यानंतर पुन्हा अचानक पोटात कळा येवू लागल्याने,महिलेला असह्य त्रास व्हायला सुरवात झाली.दरम्यान काही महिने आधी बाळांतपणात पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते.

त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉ.सुरेश पाटील यांनी महिलेला सर्जन डॉ.चंद्रदीप पाटील यांच्याकडे पाठवले असता, त्यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.त्यात मोठा गोळा दिसून आला.याबाबत अधिक तपासण्याकरून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला,त्यास महिलेच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली.

यानंतर गुरुवारी दि.५ रोजी दुपारी ११ ते ३ या वेळेत ४ तास शस्त्रक्रिया करून ३२० मि.मी. बाय २०५ मि.मी.आकाराचा ७ किलो वजनाचा मोठा मासाचा गोळा, महिलेच्या गर्भाशयाजवळील बीजांडाजवळ होता,तो बिजाशयासोबत बाहेर काढण्यात आला आहे.याशस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेने महिलेला जीवनदान मिळाल्याने,महिलेचा पती आणि वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.