जिल्ह्यातील पाच खोक्या आमदारांना आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी दिला हा इशारा

जिल्ह्यातील पाच खोक्या आमदारांना आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी दिला हा  इशारा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, (Zilla Parishad, Panchayat Samiti) नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका (Municipality, Municipal Corporation elections) आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) स्वबळावर लढविणार (Will fight own) असून जिल्ह्यातील पाच खोक्या आमदारांना (Five boxes to MLAs) जागा दाखवू, असा इशारा (warning) आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (Maharashtra State President of Aam Aadmi Party) रंगाअण्णा राचुरे यांनी मंगळवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शिवसेनेतून फुटलेल्या एकही आमदाराचे नाव न घेता दिला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा अण्णा राचुरे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, प्रदेश संघटक प्रमुख विजय कुंभार, डॉ. अल्तमस फैजी, किशोर मध्यान आदी महाराष्ट्र कार्यकारिणी पदाधिकार्‍यांसह जळगाव जिल्हाध्यक्ष. प्रा.तुषार निकम, जिल्हा सचिव डॉ. महेश पवार, जळगाव शहर अध्यक्ष योगेश हिवरकर, शहर उपाध्यक्ष डॉ.नारायण अटकोरे, महानगर सचिव डॉ.अनुजा पाटील,अ‍ॅड.विजय दाणेज,रईस कुरैशी,रत्नाकर खरोटे, योगेश भोई उपस्थित होते.सध्या देशाचे राजकारण खराब झाले आहे.

फोडा-फोडीच्या राजकारणामुळे भाजपची प्रतिमा डागाळली आहे. भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी मतदारांना अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही पूर्तता करता आलेली नाही. अशी टीका करीत, महाराष्ट्रातही परिवर्तनासाठी आम आदमी पार्टी काम करणार आहे. जळगाव जिल्ह्यात देखील एक लाख सभासद करण्याचा निर्धार केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com