आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौर्‍याच्या चौथ्या टप्प्याची सुरवात २० ऑगस्ट रोजी पाचोर्‍यातून

वैशाली ताई सुर्यंवंशी यांची पत्रकार परिषदेत माहिती
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौर्‍याच्या चौथ्या टप्प्याची सुरवात २० ऑगस्ट रोजी पाचोर्‍यातून

पाचोरा pachora (प्रतिनिधी)-

माजी पर्यटन मंत्री तथा शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे (Shiv Sena Yuvapramukh Aaditya Thackeray) यांच्या जळगाव जिल्हा शिव संवाद (Shiva dialogue) दौऱ्याची दि.२० ऑगस्ट शनिवार रोजी पाचोरा नगरीतून सुरुवात (Pachora Nagaritoon Beginning) करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात (Shiv Sena Intermediate Office) घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी विधानसभा जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेना तालुकाप्रमुख, रमेश बाफना, उपजिल्हा प्रमुख ऍड.अभय पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे,माजी तालुकाप्रमुख शरद पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, नाना वाघ, सह शिवसैनिक उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगांव जिल्ह्याच्या शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा येथून सुरुवात होणार आहे. श्री ठाकरे जळगांव येथून पाचोरा शहराकडे येतांना त्यांचे सामनेर व जागोजागी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. जारगाव चौफुली मार्गे ते भडगावरोड वरील महाराणा प्रताप चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौकातून, छत्रपती शिवाजी महाराजचौक, हुतात्मा स्मारकात अभिवादन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून शिवसेनेचे मध्यवर्ती शिवतीर्थ कार्यालया समोरील रस्त्यावर जनतेशी संवाद साधणार आहेत .

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत, समाधान महाजन, महिला आघाडीच्या पदाधिकारी महानंदा पाटील, जळगांव महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे आदींचा समावेश असणार आहे.

पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद दौऱ्यापासून मतदार संघाच्या आणि राज्याच्या शिवसेनेच्या दोन गटांच्या राजकीय धुराळ्यात मूळ शिवसेनेचे दावेदार सेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवधनुष्य हातात आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा खांद्यावर घेऊन पाचोरा - भडगाव मतदार संघात राजकीय परंपरा तोडून दोन वेळा आमदार झालेले स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या सुकन्या वैशालीताई सुर्यवंशी ह्या राजकीय रणसंग्रामात तयारीनिशी उतरणार आहेत.

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सक्रिय राजकारणामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत राजकीय संघर्ष पहायला मिळेल अश्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याचे नेतृत्व वैशालीताई पाटील ह्या करणार असून यावेळी काही जणांचे प्रवेश होणार आहे. पाचोरा नगरीत संवाद साधल्या नंतर आदित्य ठाकरे हे निर्मल सिड्स येथे भेट देऊन भडगावला जातील. तेथे नियोजित कार्यक्रमा नंतर त्या पुढील आयोजित कार्यक्रमास रवाना होणार आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आहे.त्यांच्या शिवसंवाद दौऱ्याना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसाच उस्फुर्त प्रतिसाद पाचोरा-भडगाव मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद देण्याचे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी जनतेला केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com