तांदलवाडी येथील युवकाचा चक्कर येवून मृत्यू ; उष्माघाताचा संशय

तांदलवाडी येथील युवकाचा चक्कर येवून मृत्यू ; उष्माघाताचा संशय

रावेर|प्रतिनिधी raver

तांदलवाडी (Tandalwadi) (ता.रावेर) येथील तरुणाला अचानक चक्कर येवून पडल्याने जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. प्रतिक किशोर कोळी (वय-१९ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

येथील वाल्मिकी नगरातील रहिवासी प्रतिक कोळी हा शेतमजूरीचे करतो,मंगळवारी मित्राकडे हळदीचा कार्यक्रम असल्याने तेथे हजर होता. तेथेच मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अस्वस्थ वाटून आल्याने अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने त्यास स्थानिक दवाखान्यात दाखल केले तेथून रुग्णवाहिकेने सावदा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.याबाबत विशाल सोनवणे यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,प्रतिकचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे.मयताचे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून बुधवारी दुपारी तांदलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई, वडील व मोठी बहीण असा परिवार आहे.निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com