एरंडोल येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या

एरंडोल येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या

एरंडोल   Erandole

शहरातील  परदेशी गल्ली परिसरातील एका युवकांने (youth) राहत्या घरी लोखंडी अ‍ॅंगलला साडीच्या साह्याने गळफास (hanging) घेवून आत्महत्या (suicide) केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

एरंडोल येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या
कन्नड घाटात आढळलेल्या महिलेच्या सांगाड्याबाबत गुढ कायमच

शहरातील परदेशी गली बगीचा जवळ रहिवासी राहुल संजय पाटील (वय-२०) याने आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडी च्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या वेळी तो एकटा घरी होता त्याची आई व बहिणी शेतात कामासाठी गेले होते. दुपारी तीन वाजता राहुल याची मावशी व बहिण घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.

एरंडोल येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या
बसच्या धडकेत दुचाकीस्वार तीन वर्‍हाड्यांचा मृत्यू

घरात गेल्यानंतर राहुल हा गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे त्यांनी त्याचे मावशे जितेंद्र युवराज पाटील याना कळवले. जितेंद्र पाटील त्वरित घरी आले आणि सिद्धार्थ परदेशी,अमरीश परदेशी यांच्या मदतीने राहुल यास खाली उतरवले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले. ग्रामीण रुग्णालयातील डॉ.मुकेश चौधरी व डॉ.रोहित पुराणिक यांनी त्यास तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.

याबाबत जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्याद वरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली  पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात अनिल पाटील तपास करीत आहेत , राहुल पाटील यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असून आई,वडील,बहिण शेतात मजुरीचे कामे करून आपला चरितार्थ चालवत होते. राहुलच्या पश्चात आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान राहुलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रात्री उशिरा राहुलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एरंडोल येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या
39 वर्षापासून फरार तरीही तपास नाही संपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com