
रावेर | प्रतिनिधी raver
वडगाव (ता.रावेर) येथील कालपासून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय युवतीचा मृतदेह अजंदा रस्त्यावरील विहिरीत आढळुन आला आहे.
युवती शितल मुकेश वाघोदे ही दि.२८ रोजी बेपत्ता झाली होती. तिचे दप्तर व चप्पल अजांदा रस्त्यावरील प्रकाश महाजन यांच्या विहीरीजवळ मिळुन आले होते. बुधवारी उशिरापर्यंत शोध घेतला असता मिळून न आल्याने, गुरुवारी पुन्हा शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत मिळून आला. याबाबत रावेर पोलिसात सूरज तायडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवतीचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करून वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.