लग्नाचे अमिष दाखवित नागपुरच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

शहर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नाचे अमिष दाखवित नागपुरच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

लग्नाचे अमिष (lure of marriage) दाखवित नागपुर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील 19 वर्षीय युवतीवर (young lady) दानिश मुलतानी रा. गेंदालाल मिल या तरुणाने अत्याचार (Tyranny) केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात (police) दानिश मुलतानी याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंन्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram account) 2021 मध्ये संशयीत दानिश मुलतानी व त्या तरुणीची ओळख झाली होती. काही दिवस इन्सटाग्रावर बोलणे झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबध (Romance) निर्माण झाले. दरम्यान डिसेंबर महिन्यात दानिश याने मी तुझ्याशी लग्न करेल असे म्हणत तो रामटेक येथे त्या पिडीतेला भेटण्यासाठी आला होता. यावेळी त्याने एका लॉजवर नेवून त्या तरुणीवर अत्याचार (Tyranny) केले.

तरुणाकडून लग्न मोडण्याची धमकी

दानिश याच्याकडून फोनवर त्या पिडीतेला माझ्यासोबत लग्न कर (Get married) नाही तर तुझे लग्न मोडून टाकेल अशी धमकी दिली. यावेळी त्याचा मित्र बाबू उर्फ उमर, कामील व त्याच्या मामाची मुलगी आशू यांना सांगितले. या सर्वांनी तरुणीची समजूत देखील काढली होती.

अत्याचार केल्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ

पिडीत तरुणीला दानिशचे मित्र अकील हा दि. 7 एप्रिल रोजी गेंदालाल मिल परिसरात बाबूराव उर्फ सैफ यांच्या घरी सोडले. यावेळी घरात कोणीच नसतांना दानिशने पिडीतेवर अत्याचार(Tyranny) केले. दरम्यान दानिश हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तो पिडीतेला घरी निघून जाण्याबाबत जबरदस्ती करीत होता.

घरी कुटुंबियांनी घरात राहण्यास दिला नकार

पिडीतेला दानिशच्या मित्र अकील व कामील यांनी रेल्वेत बसविले आणि ते मलकापूर येथून गाडीतून निघून गेले. दरम्यान, पिडीता घरी गेल्यानंतर त्याठिकाणी तिच्या कुटुंबियांनी (family) तीला घरात राहण्यास नकार दिला. त्यामुळे पिडीता पुन्हा जळगावला आली. यावेळी ती दि. 10 रोजी नूतन मराठा महाविद्यालयाजवळ ती रडत असतांना काही नागरिकांनी तिची विचारपूस केली. यावेळी त्या पिडीतेने घटना कथन केल्यानंतर काही सामाजिक महिलांनी (social women) तिला आज शहर पोलिसात आणले. यावेळी पिडीतेच्या तक्रारीवरुन दानिश मुलतानी याच्याविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

अत्याचार करणार्‍यास अटक

शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोउनि संदिप परदेशी यांच्यासह विजय निकुंभ, तेजस मराठे, योगेश इंधाटे, योगेश भांडारकर, रवी पाटील यांच्या पथकाने दानिश मुलतानी याला गेंदालाल मिल परिसरातून अटक (Arrested) केली.

Related Stories

No stories found.