पाय घसरून नदीत पडलेला तरुण बेपत्ता

रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु
पाय घसरून नदीत पडलेला तरुण बेपत्ता

जळगाव- jalgaon

कामावरून घरी जात (Going home from work) असलेल्या तरुणाचा (young man) पाय घसरून (Slipped feet) गिरणा नदीत बुडाल्याची (Drowned in Girna river) घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान त्या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे संदीप पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. तो आव्हाणे शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका ठेकेदाराकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवारी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कामावरून गिरणा नदीच्या पुलावरून पायी जात होता.

अचानक त्याचा पाय घसल्याने तोल जावून गिरणा नदीपात्रातील वाहत्या पाण्यात पडल्याने बुडाला. हा प्रकार भोकनी गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पाळधी पोलीस ठाण्याला कळविले. रात्री उशीरापर्यंत शोध कार्य सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com