बहिणीची छेड काढल्याच्या जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार

जाखनी नगरातील घटना; तरुण गंभीर जखमी
बहिणीची छेड काढल्याच्या जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

माझ्या बहिणीची छेड (sister teasing) का काढाली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या जितू प्रकाश गारूंगे (वय-39, रा.जाखनी नगर) या तरुणावर (youth) चाकूने हल्ला (Knife attack) करुन त्याला गंभीर जखमी (wounded) केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास जाखनी नगरात घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.

शहरातील जाखनी नगरात जितू गारुंगे हा आपल्या कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील काही तरूणांनी बहिणीची छेड काढली. या घटनेची माहिती जितूच्या बहिणीने आपला भाऊ जितू यांना दिली. त्यामुळे जितू गारुंगे हा घटना घडलेल्यास्थळी येवून त्यांनी टवाळखोरांना आपल्या बहिणीची छेड का काढली याचा जाब विचारला. टवाळखोरांना त्याचा राग आल्याने त्यांनी जितू याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर एकाने चाकूने जितूच्या डोक्यावर वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली.

कुटुंबियांनाही मारहाण

हा प्रकार त्याच्या कुटूंबियांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमी जितू याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com