हळदीच्या कार्यक्रमातील वादात तरुणावर वार ; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

हळदीच्या कार्यक्रमातील वादात तरुणावर वार ; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

हळदीच्या कार्यक्रमात सुरू असलेले गाणे बदलविले म्हणून वाद उफाळून आला होता. हा वाद एवढा विकोपाला केला की, थेट 23 वर्षाच्या तरूणाला मारहाण करून त्याच्या छातीत चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी म्हाडा कॉलनी येथे रात्री 10.30 वाजता घडली. सचिन भरत महाले (23, रा.आयोध्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री भरत हा मित्रांसोबत म्हाडा कॉलनी येथे हळदीच्या कार्यक्रमाला आला होता. कार्यक्रमामध्ये सुरू असलेले गाणे बदलविण्यास भरत याने सांगितले. याचा राग येवून तीन तरूणांनी त्याच्याशी वाद घातला. त्यातील दोन जणांनी हातात दगड घेवून भरत याला मारले. तर तिस-याने खिशातून चाकू काढून भरतच्या छातीत भोसकून गंभीर जखमी करून जर आमच्याविरूध्द पोलिसात तक्रार दिली तर यापेक्षाही जास्त मारू अशी धमकी दिली. त्यानंतर भरत याने उपचार घेतल्यानंतर गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून मारहाण करणार्‍यांविरूध्द तक्रार दिली. त्यानंतर तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com