पैसे हिसकाविण्याच्या रागातून तरुणाचा खून

तिघे मारेकरी पोलिसांच्या ताब्यात ; भर दुपारची घटना
मयत रहीम शहा उर्फ रमा
मयत रहीम शहा उर्फ रमा

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

जळगाव शहरातील शाहूनगर येथे रेल्वे पटरी जवळ पैसे हिसकावण्याच्या रागातून 25 वर्षीय तरूणाचा चाकूने भोसकून खून (Murder by stabbing) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 20 रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे शाहुनगर परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान घटनेनंतर काही तासातच शहर पोलिसांनी मारेकरी असलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथे भोंग्याजवळ रहीम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (वय-25) हा कुटुंबासह वास्तव्यास होता. बुधवारी रहीम शहा हा दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील रेल्वे रुळाजवळ झाडाखाली मद्यप्राशन करण्यासाठी बसला होता. यावेळी रहीम शहा याचा इतरांसोबत वाद झाला. या वादातून त्याच्या सोबतच्या तिघांनी चाकूने रहीम शहा यांच्या छातीवर पोटावर वार करत त्याचा खून (Murder) केला. खून केल्यानंतर तिघे मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

नातेवाईकांचा आक्रोश

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली व पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. यावेळी जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. तर रहिम याचा खून (Murder) झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. मयताच्या पश्चात पत्नी फरिनबी, आई रमजाबी मोहम्मद शहा, वडील, तीन मुली असा परिवार आहे. रहीम हा एकुलता एक होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

तपासचक्रे फिरवताच संशयित ताब्यात

शहर पोलिसांनी काही तासातच तपास चक्र फिरवून रहीम शहा याचा खून करणार्‍या तिघांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतले. पवन किसन लाडे उर्फ देवा (वय 19), मनोज जलाल गायकवाड (वय 42) व विलास तुकाराम निकम (वय 34), तिन्ही रा.गेंदालाल) असे तिघांची नावे आहेत. हे तिघेही संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मयत रहीम व मारेकरी तिघेही मित्र आहेत. एकाच परिसरात राहतात. रहीम हा शिवीगाळ करून वाद घालत तिघांना मारहाण करायचा व त्यांच्याकडील पैसे हिसकावून घ्यायचा. यामुळे तिघांमध्ये रहीम विषयी राग होता याच रागातून तिघांनी आज कटकारस्थान असून रहीमला सोबत घेत मद्य प्राशन केले व त्यानंतर त्याचा खुन केल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com