Breaking # हरि विठ्ठल नगरात कोयत्याने डोक्यात वार करुन तरुणाचा खून

जुन्या वादातुन रात्री ८:३० वा घडली घटना ; संशयित पोलिसांच्या ताब्यात
Breaking # हरि विठ्ठल नगरात कोयत्याने डोक्यात वार करुन तरुणाचा खून

जळगाव : jalgaon

दोन दिवसापूर्वी शाहूनगरातील (Shahunagar) जळकी मील भागात खून झाल्याची घटना (case of murder) ताजी असताना शनिवारी पुन्हा हरीविठ्ठल नगर (Harivital Nagar) परिसर खुनाच्या घटनेने हादरला (Shocked by the murder incident). हरी विठ्ठल नगरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुन्या वादातुन (old argument) एका तरुणाचा (youth) डोक्यात कोयता मारुन खून (Killed) करण्यात आला. दिनेश काशिनाथ भोई (वय २८ रा.हरिविठ्ठल नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाेलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

या खळबळजनक घटनेचा तपशील असा कि, शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरातील गणपती मंदिर परिसरातल्या बाजार रस्त्यावर जुन्या वादातून दिनेश भोइ याच्या घरासमोर राहणारा विठ्ठल तुकाराम पाटील-हटकर याने जुन्या वादातुन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला.

दिनेशच्या डोक्यातुन यावेळी मोठा रक्तस्त्राव झाला. ही घटना दिनेशच्या भावाला कळताच त्याने दिनेश याला रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.भर रस्त्यावर खून झालेला असल्याने हरिविठ्ठल नगरात तणाव निर्माण झाला होता.रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हरिविठ्ठल नगरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

संशयिताला घेतले ताब्यात

खुनाच्या घटनेनंतर विठ्ठल पाटील हा घटनेनंतर हरिविठ्ठल नगरात फिरत होता. ही माहिती एलसीबीचे प्रीतम पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरु होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com