
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस (Beef sale) व्रिकी होत असल्याची माहिती (Information) पोलिसांना (police) दिल्याच्या संशयावरुन तरुणाला (young man)बेदम मारहाण (brutally beaten) करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. यावेळी तरुणांनी पोलिसांशी देखील हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा (crime) दाखल केला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती सागर पुरूषोत्तम कापुरे (वय-32) रा. जुने जळगाव या तरुणाने नशिराबाद पोलीसांना दिली. या संशयावरून सोमवारी सकाळी 8 वाजता नशिराबाद येथील शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी सागर कापुरे याला बेदम मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सहाय्यक फौजदार हसमत अली बशीर अली सैय्यद आणि पोलीस नाईक सुधीर रघुनाथ विसपुते यांनी देखील धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी सकाळी 10 वाजता शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती सर्व रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.