शिवतीर्थ मैदानावर तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
शिवतीर्थ मैदानावर तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील शिवतीर्थ मैदानावर (Shivtirtha Maidan) एका टोळक्याकडून (gang) ललित गणेश चौधरी उर्फ सोनू (वय-28 रा, ईश्वर कॉलनी) या तरुणावर (youth) चॉपरने प्राणघातक (Assault by chopper) हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुणाच्या हातावर चार ठिकाणी जखम झाली असून तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार (Treatment at a private hospital) सुरु आहे. दरम्यान, हल्ला करणारा संशयित (Assault suspect) हा महिनाभरापुर्वीच जामीनावर (Out on bail) बाहेर आला असून त्याने हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातील ईश्वर कॉलनीत ललित चौधरी हा वास्तव्यास असून आज दुपारच्या सुमारास त्याला लखन मराठे उर्फ बोबड्या गोल्या याचा फोन आला. त्याने मी सबजेल मधून सुटलो आहे तु मला भेटायला आलाच नाही असे म्हणत शिवतीर्थ मैदानावर मला भेटायला ये असे सांगितले. त्यानुसार ललित हा त्याला भेटण्यासाठी गेला असता, लखनने त्याला मी बर्‍याच दिवसांपासून जेलमध्ये असल्याने माझ्याकडे खर्च पाण्यासाठी पैसे नाहीत. तु मला पैसे दे असे म्हणत पैसे मागू लागला.

ललितने माझ्याकडे पैसे नाही असे म्हणतातच लखनने त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याने लखन उर्फ गोलू बोबड्या याने कमरेला खोचलेला चॉपर काढून ललितवर वार केला. ललितने हे वार आपल्या हातावर घेतल्याने त्याचा डाव्या हातावर चारठिकाणी मोठ्या जखम झाली आहे. सोबत असलेल्या तरुणांनी तात्काळ ललित चौधरीला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर येथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारागृहात सोबत भोगली शिक्षा

जखमी ललित व संशयित लखन मराठे हे दोघ सुमारे आठ वर्षांपासून सोबत नाशिक कारागृहात होते. दोघही पॅरोलवर बाहेर आले आहे. बाहेर येताच दोघांमध्ये वाद होवून चॉपरने हल्ला झाल्याची घटना घडल्याने पोलिसांकडून यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे

पॅरोलवर बाहेर येताच केला हल्ला

तरुणावर प्राणघातक हल्ला करणारा लखन मराठे व जखमी ललित चौधरी हे दोघ चंद्रकांत पाटील खून प्रकरणातील आरोपी आहे. दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्यातील ललित हा दोन ते तीन वर्षांपासून तर लखन मराठे हा महिनाभरापुर्वी पॅरोलवर त्याच सुटका झाली आहे. बाहेर येताच दोघांमध्ये वाद होवून त्यातूनच हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com