ट्रालाखाली चिरडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग बांभोरी नाक्याजवळील घटना; वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
ट्रालाखाली चिरडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

समोरुन येणारे दुचाकीस्वार (Bike rider) अचानक ट्रालाच्या (Under the wheel of a trawler) चाकाखाली आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या नाना नथ्थू माळी (वय-40, रा. फुले नगर, पाळधी) यांचा चिरडून मृत्यू (Death) झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील (national highway) हॉटेल मराठा समोर सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वाराला वाचवितांना चालकाचे (driver) ट्रालावरील नियंत्रण सुटल्याने (lost control) ट्रालाची मागचा भाग कॅबीनपासून तुटून तो रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत पडून पलटी झाला. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी (Traffic jam) निर्माण झाली होती.

जळगाव तालुक्यातील पाळधी येथील फुले नगरात नाना माळी हे वास्तव्यास असून ते ट्रॅक्टवर चालक म्हणून काम करतात. काही कामानिनित्त नाना माळी हे एकाजणासोबत त्यांच्या (एमएच 19 डीक्यू 8749) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावात आले होते. काम आटोपून ते घरी परतत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मराठा समोरुन जात असतांना एका दुचाकीचा नाना माळी यांच्या दुचाकीला कट लागला. यात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरुन येणार्‍या (आरजे 01 जीबी 6465) क्रमांकाच्या ट्रालाच्या समोर आली. दुचाकी अचानक समोर आल्याने ट्रकचालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुचाकीच्या मागे बसलेले नाना माळी हे ट्रालाच्या चाकाखाली येवून चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ट्राला चालक घनश्याम मगनलाल माळी रा. कोचील ता. किसनगड जि. अजमेर राजस्थान हा (आरजे 01 जीबी 6465) क्रमांकाचा ट्रालामध्ये घरसाठी लागणारे टाईल्स घेवून गुजरातवरुन हैदराबाद येथे घेवून जात होता.

कॅबीन तुटून पलटी झाला ट्राला

पाळधीकडून जळगावकडे येणार्‍या ट्रालाच्या समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने ट्राला चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक महामार्गाच्या साईड पट्ट्यांच्या खाली उतरला. दरम्यान, त्यासाठी असलेल्या चारीच्या काठावरुन घसरल्याने ट्रालाची मागील भाग कॅबीनपासून तुटून तो पलटी झाली होती.

जिल्हा रुग्णालयात

नातेवाईकांची गर्दी

अपघातात नाना माळी यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या गावातील नागरिकांसह नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

ट्रकचालकाला घेतले ताब्यात

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी जयेंद्र पाटील, अतुल सोनवणे, विश्वनाथ गायकवाड, सतिष हाळनोर, दिनेश पाटील, अनिल फेगडे यांनी घटनास्थही धाव घेतली. दुचाकीस्वाराला चिरडल्यामुळे याठिकाणी जमाव जमत असल्याने पोलिसांनी ट्रालाचालकाला ताब्यात घेवून त्याला पोलीस ठाण्यात रवाना केले.

दुचाकीचालक पसार

नाना माळी हे एका व्यक्तीसोबत जळगावला आले होते. त्यांची दुचाकी तो व्यक्ती चालवित होता. ट्रालाच्या खाली चिरडून नाना माळींचा मृत्यू झाल्याचे बघताच तो दुचाकीचालक घटनास्थळाहून पसार झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com