
चाळीसगाव chalisgaon । प्रतिनिधी
तालुक्यातील पातोंडा येथील एका तरूणाने (young man) शेतात झाडाला दोरी बांधून गळफास ( hanged himself) घेवून आत्महत्या (suicide) केली आहे. याप्रकरणी मयत तरूणाच्या आईने महिलेची छेड काढल्याचा आळ घेऊन अपमानित केल्याच्या कारणावरून तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करत दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून शहर पेालिस स्टेशनल गुन्हां दाखल केला आहे.
चाळीसगांव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पातोंडा गावातील तुषार बाबुलाल माळी (वय 38) याने महिलेची छेड काढली असा आळ घेत गावातील निलेश सुरेश वाघ आणि सुरेश वाघ अश्या दोघांनी मयत तुषार याला घरी बोलवून घरात व गावातील हनुमान मंदिराजवळ शिवीगाळ करून चापटयांनी मारहाण केली.
घडलेल्या या प्रकरणाने अपमानित झालेल्या तुषार याने पातोंडा शिवारातील मुंदखेडा धरणातील माती बंधार्याजवळील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला मयताच्या आईने दिल्याने तक्रारी वरुन शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे अधिक तपास करीत आहेत.