पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शिरसोली येथे दर्गावर दर्शन घेतल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी (swim with friends) गेलेल्या इयत्ता दहावीतील अमोल ज्ञानेश्वर भालेराव (Amol Dnyaneshwar Bhalerao) (वय-15, रा. समता नगर) या तरुणाचा शिरसोली (Shirsoli) येथील तलावात बुडून (drowning in a lake) मृत्यू (Death) झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.

समता नगरात अमोल भालेराव हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गुरुवारी काही तरुण शिरसोली येथे दर्गावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, दर्शन घेतल्यानंतर सर्व मित्र पोहण्यासाठी जवळच असलेल्या तलावावर गेले.

याठिकाणी पोहत असतांनाच पाण्याचा अंदाज न आल्याने अमोलचा तलावात बुडून मृत्यू झाला. सोबत असलेल्या मित्रांना अमोल बुडाल्याचे कळताच त्यांनी गावकर्‍यांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढत तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले.

समता नगरातील तरुण बुडाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांसह अमोलच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतल्याने याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती.

आजच केली होती दहावीची अ‍ॅडमिशन

अमोल हा यंदा इयत्ता दहावीत गेला होता. अमोलचे वडील मनपात कंत्राटी सफाई कर्मचारी असून त्याच्या वडीलांनी आजच घराजवळील शाळेत अमोलची दहावीच्या वर्गात अ‍ॅडमीशन घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासाच अमोलचा बुडून मृत्यू झाल्याने त्याच्या वडीलांसह कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला.

दोघ घटनांनी समता नगरावर शोककळा

दुपारच्या सुमारास समता नगरातील प्रौढाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ताजी असतांना त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहत असलेला अमोल भालेराव याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या दोघ घटनांमुळे समता नगरावर शोककळा पसरली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com