दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

ममुराबाद गावाजवळील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद
दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव- jalgaon

रुग्णालयात बघण्यासाठी (see the hospital) आलेल्या तरुणाची दुचाकी (young man's bike Slip) घसरून अपघात (accident) झाल्याची घटना मंगळवारी ममुराबाद गावाजवळ (Mamurabad village) घडली. या अपघातात शिवदास रोहीदास भील उर्फ भगत (वय-१७) रा.किनगाव, ता.यावल या तरुणाचा मृत्यू (death) झाला. तर त्याच्यासोबत असेलेले दोघ जखमी झाले. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील कीनगाव येथे शिवदास भिल हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शिवदास हा त्याचा मित्र किरण जगदीश कंडारे व अमोल देवानंद महाजन यांच्या सोबत मंगळवारी दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या गावातील मुलाला बघण्यासाठी दुचाकीने आले होते. काम आटोपून ते तिघे माघारी परतत असताना ममुराबाद गावाजवळ दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात शिवदास याच्या डोक्याला

गंभीर दुखापत होऊन शिवदासचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले अमोल आणि किरण दोघ किरकोळ जखमी झाले. तिघांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. शिवदास याच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com