ताडे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताडे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

निपाणे (Nipane) ता.एरंडोल वार्ताहर

ताडे (Tade) येथील तरुणाने (youth) घरात गळफास (Hanged at home) घेऊन आत्महत्या (suicide) केली.

ताडे येथील रहिवासी नितीन संजय धनगर याने (वय २६ वर्षं) कपाशी वेचण्याचे शेतात काम सुरू होते म्हणून सकाळी ८ वाजता आई व लहान भावाला मोटरसायकलने शेतात सोडले व घरी आला. घरात एकटा असल्याने घराच्या छताच्या कडीला दोरी अडकून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल दिनांक १ रोजी घडली. या बाबत कासोदा पोलिस स्टेशनमध्ये खबर देण्यांत आली आहे.

नितीनच्या आत्महत्याने गावावर शोककळा पसरली आहे.

   नितीन धनगर हा घरातील कर्ता तरुण होता. एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नितीन धनगर यांच्या पश्चात आई , भाऊ , असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com